करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

संभाजीनगरच्या दोघांना करमाळ्यात लुटले ; तीघांना मुद्देमालासह अटक

करमाळा समाचार 

स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखवत चिकलठाणा जिल्हा संभाजीनगर येथील दोघांना चाकुचा धाक दाखवत मारहाण करून त्यांच्याकडील दीड लाख रुपये लुटल्याप्रकरणी तिघांना करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणात एक आरोपी अद्याप फरार असून चौघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार हा दि १० जून रोजी दुपारी बारा वाजता पांडे परिसरात घडला आहे. संबंधित आरोपींचा पोलिसांनी बारा तासात शोध घेत पकडले आहे. सदरची कारवाई पोलिस निरिक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

प्रकरणी छगन बिरक्या शिंदे, ज्ञानेशवर छगन शिंदे, संतोष दिलीप शिंदे सर्व रा. निमगाव (ह) ता. करमाळा यांना ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानी गुन्हा केल्याची कबुली दिली असून दिड लाख रोख रक्कम, चाकू व एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी ज्ञानेशवर शामराव टेकाळे (वय ३५), मुळ रा. चिखलठाणा, जि. संभाजीनगर सध्या रा. राहुरी जि. अहिल्यानगर यांनी तक्रार दिली आहे.

politics

याबाबत अधिक माहीती अशी की, चार महिन्यापूर्वी मांढरदेवी ता. वाई येथे देवदर्शन करीत असताना सविता छगन शिंदे रा. निमगाव ह. ता. करमाळा हिच्या सोबत ओळख झाली व तिने फिर्यादीस माझ्याकडे अर्धा किलो सोने आहे मला शेतीच्या कामासाठी पैशाची गरज आहे मी ते सोने कमी भावात विकणार आहे असे म्हणून ज्ञानेश्वर टेकाळे याचा विश्वास संपादन केला व दि २९ मे २०२५ रोजी टेकाळे व त्यांचा मित्र सतिश काळे यांना करमाळा बस स्टॅन्ड येथे बोलावून त्याठिकाणी सविता व छगन बिरक्या शिंदे यानी एक खरी सोन्याची अंगठी व नथ दाखविली ती नथ व अंगठी सोन्याची असल्याची खात्री झाल्याने टेकाळे व त्याचा मित्र सतिश काळे यांनी कमी पैशात सोने मिळत असल्याने दिड लाख रूपये पैशांची जमवाजमव केली व त्यांनी सोने घेण्याकरीता सविता शिंदे, ज्ञानेशवर शिंदे यांच्याशी संपर्क केला.

दि १० जुन रोजी टेकाळे मित्रासोबत आले. करमाळा येथे आले असता, संशयीत आरोपीनी सोने आमच्या घरी आहे, आमच्या घरी चला असे म्हणुन दुपारी १२ वा च्या सुमारास मोटार सायकल सह आरोपीच्या सोबत सोने घेण्याकरीता पांडे गावाच्या शिवारात वनविभागात नेले. व आरोपी सविता छगन शिंदे, छगन बिरक्या शिंदे, ज्ञानेशवर छगन शिंदे, संतोष दिलीप शिंदे यानी फिर्यादीस सोने न देता पैशाची मागणी करून शिवीगाळी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली त्याच वेळी आरोपी ज्ञानेशवर छगन शिंदे याने त्याच्या खिशातील चाकू काढून फिर्यादीस मारण्याची धमकी देवून दिड लाख रूपये सोने न देता जबरीने काढून घेतले.

पो.नि. रणजीत माने, सपोनि रोहित शिंदे, सपोफौ विश्वास शिनगारे, पोहेकॉ नागेश नाईकनवरे, आप्पासाहेब लोहार, अजित उबाळे, पोहेकॉ विलास भराटे, पोना मनिष पवार, पोकॉ योगेश येवले, पोकॉ मिलिंद दहिहांडे, पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ अमोल रंदिल, पोकॉ रविराज गटकुळ, पोकॉ हरिदास निमगिरे, पोकॉ रमेश फुगे, मपोकॉ शितल पवार, पोकॉ धनाजी रामगुडे यांनी केली आहे.

अमिषाला बळी पडु नका …
काही विशिष्ट समाजाचे लोक इतर ठिकाणाचे लोकांना विश्वासात घेवून ओळखी करून त्यांना आमच्याकडे स्वस्तात सोने असून कमी बाजार भावा पेक्षा दरात देतो असे सांगून काही खरे सोने दाखवून इतर सोने खरेदीसाठी दुस-या ठिकाणी बोलावून घेवून त्यांना शेतात, फॉरेस्टमध्ये नेउन मारहाण करून चाकूचा धाक दाखवून सोने न देता फसवणुक करून मारहाण करून पैसे घेवून जातात. स्वस्त सोने मिळणे असा कोणताही प्रकार नसतो ते केवळ आमिष आहे. तरी सदरच्या अशा आमिषाला कोणीही बळी पडू नये तसेच असे काही प्रकार आढळल्यास पोलीस ठाणेशी संपर्क करावा.
रणजीत माने, पोलिस निरिक्षक, करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE