करमाळासोलापूर जिल्हा

खुपसेनंतर आता संभाजी ब्रिगेड व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल ; सक्तीच्या वीज बीलाविरोधात होते आंदोलन

करमाळा समाचार 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसह वेगवेगळ्या पक्ष्यांच्या तब्बल 15 जणांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये मंगळवारी आंदोलन करणारे अतुल खूपसे यांच्यासह सात जण तर बुधवारी आंदोलन करणारे संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप यांच्यासह आठ जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. खुपसे यांनी कुंभेज फाट्यावर रास्तारोको तर संभाजी ब्रिगेड ने जेऊर येथे महावितरण कार्यालयावर घेराव घातला होता.

करमाळा तालुक्यात सुरू असलेली वीज वितरण कंपनीची सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी तसेच बंद असलेली वीज त्वरित सुरू करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जेऊर वीज वितरण कंपनी कार्यालयावर हलगी नाद आंदोलन करण्यात आले यावेळी

लोकसेवकाने पारित केलेल्या सरकारी आदेशाची कोणत्याही सबळ कारणाशिवाय अवहेलना करून महाराष्ट्र शासनाचे निर्देश तसेच मा.जिल्हाधिकारी साो,सोलापूर यांचे आदेशाची अवहेलना केलेली आहे. तसेच स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका निर्माण होर्इल असे कृत्य केले आहे.

म्हणून सचिन महादेव जगताप वय 35.सापटणे, ता. माढा, शंकर पोळ वय 30 शेटफळ, अमित घोगरे, वय 40.चिखलठाण, रविद्र गोडगे वय 40सोगाव, रामभाऊ शेळके वय 40रावगाव, अमोल घुमरे वय 35.जातेगाव, बापुराव फडतरे वय 40 सातोली, बाळासाहेब मोहन तोरमल वय 45.कुंभेज यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE