कर्जत येथील अपघातात देवीचामाळ येथील दोन युवक ठार
करमाळा समाचार
लग्नाच्या निमित्ताने गेलेल्या दोन युवक अपघातात ठार झाले आहेत. मोटर सायकल व कार गाडीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत करमाळा तालुक्यातील देवीचामाळ येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरचा अपघात दि २६ रोजी दुपारी चारच्या सुमारास सटवाई फाटा कर्जत रस्ता या ठिकाणी घडला आहे. अपघातातील एक महापरिवहन येथे हेल्पर म्हणून तर दुसरा विद्यार्थी आहे.

गणेश बेंद्रे (वय २८)व शिवम चांदगुडे (वय १८) रा. देवीचा माळ ता. करमाळा असे दोघांची नावे आहेत. गणेश हा हेल्पर म्हणून तर शिवम विद्यार्थी होता नुकतेच त्याला बारावीच्या परीक्षेत ९० गुण गुण मिळाल्याने पुढील प्रवेशासाठी जाणार होता त्यापूर्वीच अपघात घडला.

बुधवारी दोघेजण लग्नाच्या निमित्ताने कर्जत परिसरात गेले होते. लग्नकार्य उरकून माघारी येत असताना सटवाई फाट्याजवळ स्विफ्ट कार व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान स्थानिकांनी त्यांना कर्जत देतील रुग्णालयात नेले. यावेळी उपचारापूर्वीच दोघेही मयत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सदर प्रकरणाची कर्जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत. सदरच्या अपघाताची माहीती मिळताच करमाळा तालुक्यातुन युवकांनी कर्जत ला गेले याठिकाणी दोघांवर शवविच्छेदन करण्यात आले. दोघांच्या घरची परिस्थिती नाजुक असुन बेंद्रे हे कमवते तर शिवम हुशार व एकुलता एक मुलगा गमवल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.