उजनीकाच्या शेतकऱ्यांना दुष्काळात ‘तेरावा’ ; रोज नव्या संकटाचा सामना
करमाळा समाचार – संजय साखरे
राजाने छळले, नवऱ्याने मारले आणि पावसाने झोडपले तर तक्रार कोणाकडे करायची? अशी काहीशी अवस्था यावर्षी उजनीकाठच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांची झाली आहे. यावर्षी कमी पावसामुळे उजनी धरण जेमतेम 60 टक्के भरले .त्यातच पाण्याच्या अयोग्य नियोजनामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. पर्यायाने दुबार पम्पिंग चा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

यामुळे पाईप व् केबल याच्या रूपाने मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. याशिवाय धरणातील वीज पुरवठा ही आठ तासावरून सहा तास करण्यात आलेला आहे.
यात भर म्हणून की काय एक नवीन संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. उजनीकाठच्या वाशिंबे परिसरातील भैरवनाथ ग्रुप चारी वरील शेतकऱ्यांच्या विद्युत पम्पाची तोडफोड करून आतील वायरची चोरी करण्यात आली एका. हा प्रकार गेल्या आठवड्यापासून दोन वेळेस घडला आहे.
भैरवनाथ ग्रुप चारी वरील पाच विद्युत मोटरीची तोडफोड करून चोरट्यांनी आतील वायर चोरून नेल्या आहेत्. यामध्ये गणेश झोळ, आदम शेख ,राजीव शिंदे, हनुमंत बोबडे यांनी गोकुळ साखरे यांच्या मोटरीच्या वायरची चोरी करण्यात आली आहे.

वाशिंबे येथील भैरवनाथ चारीवर आमच्या मोटरी असून काल रात्री अज्ञात इसमाने आमच्या मोटरीची तोडफोड करून आतील वायर चोरी गेल्या आहेत.
-गोकुळ साखरे -शेतकरी