करमाळा तालुक्यात ३२ शेळ्यांचा दुर्दैवी अंत ; शेतकऱ्याकडुन भरपाईची मागणी
वाशिंबे प्रतिनिधी
विद्युत प्रवाहाची केबल तुटून गोठ्यावर पडल्याने ३२ शेळ्या म्रुत्यु पडल्याची घटना केतूर. २ येथे घडली आहे. शनिवारी ता. १२ पहाटे ५ वाजताच्या सुमारास हा प्रकार झाला.

केत्तूर १ येथील येथील तात्याराम कोकणे यांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे. त्या गोठ्यावरुन महावितरण कंपनीच्या पोल वरुन घरगुती वीज जोडणी दिलेली केबल जात आहे. पहाटे ही केबल तुटून गोठ्यावर पडली. त्याचा करंट या शेळ्यांना लागला. यामुळे ३२ शेळ्या जागीच मृत्यू झाल्या.
घटनास्थळी गाव कामगार तलाठी माने यांनी भेट दिली आहे. केतुर पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सोमनाथ खरात यांच्याकडून शवविच्छेदन करण्यात आले आहे. नुकसानीची सरकारकडून भरपाई मिळावी अशी मागणी कोकणे कुटुंबबीयांनी केली आहे.
