करमाळासोलापूर जिल्हा

डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी प्राथमिक शिक्षिका सौ स्वाती सदाशिव जाधव यांची निवड 

करमाळा समाचार 

सोलापूर विद्यापीठाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या संशोधन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेतून डॉक्टरेट पदवी अभ्यासक्रमासाठी जिल्हा परिषद शाळे मधील शिक्षिका सौ स्वाती सदाशिव जाधव यांची निवड झाली आहे.

सौ स्वाती जाधव ह्या सध्या जि.प.प्राथ.शाळा मलठण, ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर येथे पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. डी.एड. नंतर प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाल्यानंतर आपले शिक्षण न थांबता जिद्द ,मेहनत व चिकाटीने ते सुरु ठेवत बी.ए. (इंग्लिश), एम. ए. (इतिहास) , एम. ए. (शिक्षणशास्त्र), बी. एड., डी. एस. एम. अशा प्रकारे पदवी, पदव्युत्तर पदवी या शिक्षणाचा टप्पा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच स्वतःची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता उंचावत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.
त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून शिक्षक वर्गातून कौतुक होत आहे.या निवडीबद्दल कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण येथील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सह दिवाणी व फौजदारी न्यायालय, बार्शी येथे कार्यरत असणारे व सोलापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष, श्री सदाशिव जाधव यांच्या सौ स्वाती जाधव ह्या सुविद्य पत्नी आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE