दुर्दैवी घटना – मामाच्या गावाकडे राहत असलेल्या मुलगा पडला नदीत ; शोध सुरु
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात दि 14 रोजी दुर्दैवी घटना घडली आहे. जनावरे चारण्यासाठी नदीकडेला गेलेल्या मुलगा पाण्यात पडल्याची घटना घडली आहे. त्याचा शोध सध्या वेगात शोध घेतला जात असून अद्याप तो मिळून आला नाही.

घटनास्थळावर आपत्ती व्यवस्थापन समितीने भेट दिली आहे. तर मच्छिमार ही दाखल झाले आहेत. यावेळी प्रशासन तातडीने पावले उचलत त्या मुलाचा शोध घेत आहे. सदरची घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे.

ओम शेळके वय १० असे त्याचे नाव आहे. ओम हा पोथरे येथे मामाच्या गावाला राहत होता. अचानक पडल्यानंतर त्याची आई जवळच होती तीही पाण्यात उतरली पण तो मिळुन आला नाही. आई ने मोठ्याने हंबरडा फोडला त्यावेळी इतर गोळा झाले व त्यांनी शोधकार्यास सुरुवात केली आहे.