करमाळासोलापूर जिल्हा

दुख: द – पोथरे गावातुन सीनानदीत वाहत गेलेल्या मुलाचा मृतदेह मिळाला

करमाळा समाचार 

असा शोध सुरु होता

तालुक्यातील पोथरे येथे सीना नदीच्या पात्रात दहा वर्षाचा मुलगा पाण्यात पडला होता. परिसरातील आपत्ती व्यवस्थापन समिती, मच्छिमार तसेच पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने त्या मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू केले. सदरच्या मुलाचा मृतदेह मिळुन आला आहे. सदरची घटना दि १४ रोजी दुपारी ३ च्या सुमारास सिनथडी वस्ती, पोथरे शिवारात घडली होती तर मृतदेह आज सकाळी साडे आठच्या सुमारास मिळुन आला आहे.

ओम अनिल शेळके (वय १०) रा. वेळू ता. श्रिगोंदा जि.अहमदनगर सध्या पोथरे असे पाण्यात पडलेल्या मुलाचे नाव आहे. सदरचा मुलगा मागील दोन महिण्यापासुन आई सोबत आजोबा आत्माराम झिंजाडे यांच्याकडे ऱाहत होता.

मंगळवारी दुपारी आजोबाच्या घरापासून काही अंतरावर नदी सीना नदी पात्रात शेजारी गेला होता. जनावरा सोबत दोरीला धरून मुलगा पाण्यात पडला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी आई पाण्यात उतरली परंतु मुलगा हाताला लागला नाही. नंतर आईने पाण्याबाहेर येऊन आरडाओरडा केल्यानंतर आसपासचे ग्रामस्थ गोळा झाले. मुलाचे शोध कार्य सुरू झाले. बोरगाव, पोथरे व पोटेगाव येथील मच्छीमार व पट्टीचे पोहणारे बोलून त्या मुलाचा शोध घेतला जात होता.

रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. यावेळी करमाळा पोलीस ठाण्याचे हवालदार मारुती रंधवे, मंडळ अधिकारी राजेंद्र राऊत, तलाठी मयूर क्षीरसागर, सरपंच धनंजय झिंजाडे, पोलीस पाटील संदीप शिंदे व कोतवाल सोमा खराडे, राष्ट्रवादीचे शिवाजी जाधव  यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन समिती व गावकरी शोध मोहीमेत सहभागी झाले होते.

अखेर मुलाचा मृतदेह वाहून गेलेल्या ठिकाणापासून पोटेगावच्या दिशेने प्राधिकरणाच्या पाईप लाईन जवळ मिळुन आला आहे. साधारणता अर्धा किलोमीटर अंतरावर हा मृतदेह मिळून आला आहे. रात्रभर शोध घेतल्यानंतर सकाळी साडे आठ ते पावणे नऊ च्या दरम्यान पोटेगाव शिवारात पाईप लाईन शेजारी झुडपात सदर मुलाचा मृतदेह मिळून आला आहे.

Tragedy: The body of a boy was found floating in the river Sinan from Pothare village

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE