E-Paperताज्या घडामोडी

दुर्दैवी घटना – सर्पदंशामुळे चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यु ; पळसदेव परिसरातील घटना

केत्तूर (अभय माने)

वैष्णवी महेश केवटे (वय 4) राहणार कान्हापुरी पंढरपूर (जि.सोलापूर) सध्या उजनी जलाशया जवळील पळसदेव शेलारपट्टा (ता.इंदापूर) येथे राहत असून शुक्रवारी मध्यरात्री विषारी साप चावल्याने तिचा मृत्यू झाला.

यासंदर्भाची माहिती अशी की, महेश केवटे हे मूळचे पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथे राहणारे असून सध्या मासेमारी व्यवसायानिमित्त पळसदेव शेलारपट्टा (ता.इंदापूर) येथे येऊन राहत आहेत.शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान राहत्या कोपीमध्ये साप गेल्याचे अनेकांनी पाहिले होते.त्याप्रसंगी सापाला कोपीतून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी शोध शोध करूनही तो साप दिसून आला नाही. यामुळे तो साप निघून गेला असेल असे समजून त्यानी तो विषय तेथेच सोडून दिला आणि जेवण झाल्यानंतर प्रत्येकजण झोपी गेले.

politics

मात्र मध्यरात्री त्याच विषारी सापाने वैष्णवीच्या कानाचा दोन वेळा चावा घेतला.यामुळे वैष्णवी मोठ्याने रडत आईला कानाजवळ व डोक्यात मुग्या येत असल्याचे सांगत होती, तर बहीण कानातून रक्त येत असल्याचे घरच्यांना दाखवत होती.त्यानंतर थोड्याच वेळात वैष्णविला उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला.याप्रसंगी वैष्णवीचे वडील मासे पकडण्यासाठी नदीच्या पलीकडच्या बाजूला गेले होते.

फोनवरून त्याना घटनेची माहिती देताच ते तात्काळ घरी आले व पुढील उपचारार्थ गावातील खाजगी दवाखान्यात नेले असता,तिची परिस्थिती नाजूक असल्याचे पाहून तात्काळ डॉक्टरांनी इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात जाईपर्यंत वैष्णवीच्या शरीराची हालचाल पूर्णतः ठप्प झाली होती व डॉक्टरांनी तीला मृतघोषित केले.

वैष्णवीच्या मृत्यूची खबर समजताच त्यांच्या नातेवाईकातून हळहळ व्यक्त केली जात होती. अंत्यविधी सकाळी साडे नऊ वाजत शेलरपट्टा येथे करण्यात आला..

उजनी जलाशयाचे पाण्याने निचांकी पातळी गाठल्याने शेतकरी पिके जगविण्यासाठी दिवस रात्र रानात कष्ट घेत आहेत.पाणी कमी झाल्याने उजनी लाभक्षेत्रात साप दिसण्याचे प्रमाण वाढले आहे.पोमलवाडी (ता. करमाळा) येथील शेतकरी सुधाकर नवले यांना एक साप आपल्या मोटारीच्या फुटबॉल जवळ सकाळी अडकल्याचे दिसून आले होते.तू साप अडकल्याने मृत झाला होता.

उजनी जलाशयाच्या जवळील शेतकऱ्यांनी रात्री अपरात्री पाण्याजवळ जाताना कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE