करमाळाक्राईमताज्या घडामोडीबार्शीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

बार्शीच्या डॉक्टरांच्या गाडीला कामोणे येथे भिषण अपघात ; दोन ट्रकांच्या मध्ये अडकली कार

करमाळा समाचार

अहिल्यानगर (अहमदनगर)- टेंभुर्णी मार्गावर कामोणे फाटा येथे भीषण अपघात झाला असून गाडीतील पाचही प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. सदरचा अपघात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कामोणे फाटा येथे झाला होता. यावेळी घटनास्थळी ग्रामस्थ तसेच पोलीस यांनी पोचल्यानंतर तात्काळ संबंधितांना रुग्णालयात पोहोच केले. जवळपास एक तास वाहतूक खोळंबली होती.

बार्शी येथील डॉ. मनोज जाधव हे कुटुंबीयांसह नगरहून बार्शीच्या दिशेने निघाले होते. अहिल्यानगर (अहमदनगर)- ते जातेगाव सुपरफास्ट असा रस्ता असल्याने गाड्या वेगवान धावत होत्या. परंतु करमाळा तालुक्याची हद्द सुरू झाल्यानंतर रखडलेल्या जातेगाव टेंभुर्णी रस्त्यावर प्रवास करीत असताना पाठीमागून येणाऱ्या माल ट्रकने जाधव यांच्या कार गाडीला धडक दिली. त्यानंतर जाधव यांची गाडी पुढे असलेल्या माल ट्रक मध्ये जाऊन धडकली व अडकली. दोन्ही बाजूने धडक बसल्याने गाडीचा चकनाचुर झाला. सुदैवाने गाडीतील प्रवाशांना किरकोळ जखमा आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्यावर उपचार करून पुढे पाठवण्यात आले आहे.

politics

सायंकाळी सात वाजता अपघात झाल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले. यावेळी हवालदार सचिन हिंगमिरे, पोलिस नाईक प्रदिप जगताप, हवालदार डोंगरे, हवालदार महेश रोडगे, पोलिस कॉन्स्टेबल दिपक कांबळे, समीर शेख व मांगीचे पोलिस पाटील यांनी घटनास्थळी जात वेळीच अपघातग्रस्तांना बाहेर काढले व एक तास खोळंबलेली वाहतूक पुन्हा एकदा सुरू केली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE