आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
करमाळा समाचार
आज दि. 23 रोजी निंभोरे येथील विष्णु तात्यासाहेब शिंदे यांच्या घरावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ स्मारकाचा अनावरण सोहळा आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच अभिषेकाचा कार्यक्रम व होम-हवन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी निंभोरे गावचे युवा नेते रविंद्र वळेकर, उद्धव दादा माळी, महाराष्ट्र केसरी चंद्रहासबापू निमगिरे, जेऊरचे युवक नेते माणिकदादा पाटिल, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे साहेब, माजी सरपंच अविनाश वाघमारे, कैलास काकडे, विठ्ठल वळेकर, दशरथ पाटील, हरी सांगडे, ज्ञानेश्वर वळेकर, स्वप्निल नलवडे, नाथा शिंदे, अक्षय वळेकर, पप्पू मस्के, राज पठाण, दत्ता वळेकर उपस्थित होते.
