करमाळासोलापूर जिल्हा

पाण्याची आवक वाढल्याने आवर्तनाचा विचार – आ. संजयमामा शिंदे ; अधिकाऱ्यांसोबत बैठक

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदायिनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू करणे तसेच योजनेची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करणे ई. विषयावरती करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करमाळा येथे संपर्क कार्यालयात योजनेचे अधिकारी व कर्मचारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी सिव्हिल, हायड्रो, मेकॅनिकल, एम. एस. ई .बी तसेच दहिगाव योजनेचे कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.

सध्या मावळ प्रांतात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे उजनी धरणात पाण्याची आवक आज रोजी 60 ते 70 हजार क्यूसेक् या वेगाने होत आहे. हाच पाण्याचा ओघ 7 दिवस कायम राहिला तर उजनी धरण 33 टक्के पेक्षा पुढे जाईल हे गृहीत धरून आवर्तन सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. थकित 56 लाख विज बिल भरून धरण 33 टक्के च्या पुढे गेल्यास तात्काळ आवर्तन सुरु करण्याच्या सूचना आ. शिंदे यांनी योजनेच्या अधिकाऱ्यांना दिल्या त्यामुळे खरीप आवर्तन सुरु होण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

योजनेची अपूर्ण कामे वेगाने पूर्ण करणे, कुंभेज येथील चौथा पंप बसवणे , पूर्ण दाबाने पाणी टेलला पोहोचविणे, पाणीचोरी यावरती आळा घालणे, त्यासंबंधी सुरक्षेचे उपाय योजने, निधी उपलब्ध झाल्यानंतर करावयाच्या कामाचे सर्वेक्षण करणे आदी विषयावरती या बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीसाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री जाधवर ,दहिगाव उपसा सिंचन योजना चे उपअभियंता सी. ए. पाटील, शाखा अभियंता कांबळे , राजगुरू, मेकॅनिकल विभागाचे गोरे ,एम. एस. ई. बी चे भांगे, मे पियुष इन्फ्राटेकचे विनायक अनविकर, माधव सावरीकर , श्रीराम पवार हे उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE