उत्तरेश्वर ज्यु. कॉलेजच्या यशवंत-गुणवंतांचा विशेष गुणगौरव
करमाळा समाचार – केम
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर जूनियर कॉलेज केम येथील यशवंत गुणवंताच्या कार्यकर्तुत्वाचा विशेष गौरव कार्यक्रम संपन्न झाला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कार्यकुशल मार्गदर्शिका संस्था सचिवा प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे यांच्या शुभहस्ते या यशवंत गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात आला.

श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमधील प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे यांच्या “डॉ.बापूजी साळुंखे आणि मराठवाडा” या चरित्र ग्रंथास राज्यस्तरीय संत नामदेव चरित्र पुरस्कार, कु.लक्ष्मी देवकर या विद्यार्थिनीस महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती प्रकल्पाअंतर्गत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत रोख दहा हजार रुपये व सन्मानपत्र, कु. शुभांगी शिंदे या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय नाशिक बालकवी काव्य संमेलनात राज्यात दुसरा क्रमांक व विद्यावार्ता ऑनलाईन भाषण स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक व रोख दीड हजार मिळाल्यामुळे या यशवंत – गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, प्राचार्य विष्णू कदम, प्रा. अमोल तळेकर, प्रा. मालोजी पवार, श्री सागर महानवर हे उपस्थित होते. या विशेष कार्यकर्तृत्वाच्या यशाबद्दल शालेय समिती अध्यक्ष श्री मोहनआबा दौंड, मा.आजीव सेवक श्री डी. व्ही.पाटील, सर्व उत्तरेश्वर परिवारातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.