E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

जामखेड मध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात तीघे जखमी ; एक अनोळखी जखमी चालक करमाळ्याचा असल्याचा संशय

जामखेड प्रतिनिधी

 

 

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्यामुळे आज दोन वेगवेगळ्या अपघातात तीघांना मदत केली आहे. वालचंद नगर ते बीड कडे जाताना एक तर एम एच ४५ पासिंग असलेल्या गाडीचा अपघात झाला आहे. त्याच्यावर असलेल्या व्यक्ती अद्याप ओळख पटलेली नाही. करमाळा तालुक्यातील असल्याचे बोलले जात आहे.

वालचंद नगर ते बीड कडे जात असताना एम एच ४२ क्यु २९०० स्कार्पीओ मोटार सायकलची धडक झाल्याने सौताडा येथील एचपी पेट्रोल पंपासमोर अपघात होऊन दोन जण जखमी झाले अनिकेत रणमोडे वय ३० इंदापुरजि. पुणे सूर्यकांत तेलगे वय ५५ इंदापुर जि. पुणे हे दोघे गंभीर जखमी झाले असून घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते यांनी रुग्णवाहिका पाठवून त्यांना दवाखान्यात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले.

तसेच सायंकाळी आठ वाजता चिंचपूर हद्दीमध्ये गौरी हॉटेल समोर टि. व्हि. एस. १०० मोटर सायकल क्र. एम. एच. ४५ अे. झेड. ७७०१ अज्ञात चारचाकी वाहनाची धडक होऊन त्यामध्ये एक ६० वर्षीय इसम जखमी झालेला आहे. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. तो जामखेड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. यास पण सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आणून त्याचे प्राण वाचवले या अपघातातील जखमींना संजय सानप, हनु शिंदे सौताडा , हरिदास गळगटे आष्टा यांनी मदत केली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE