महसुल विभागातील रिक्त पदे त्वरित भरावीत- महसुल मंत्री यांच्या कडे मागणी – मांढरे-पाटील
करमाळा – संजय साखरे
करमाळा तालुक्यातील महसुल विभाग मध्ये कित्येक वर्षं झाली अनेक पदे हि रिक्त आहेत. त्यामुळे जास्तीचा पद भार अनेक अधिकारी वरती पडतं आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढत आसल्या कारणाने गोरगरीब लोकांची कामे वेळेत होत नाहीत. परिणामी लोकांना एका कामासाठी अनेक वेळा सरकारी ऑफिसच्या चकरा माराव्या लागत आहेत .अनेक वर्षांपासून मंडलाधिकारी, तलाठी सह अनेक पद रिक्त आहेत त्यामुळे या पदाची भरती त्वरित कराव्यात व ज्या अधिकाऱ्यांचा बदलीचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे परंतु त्यांच्या बदल्या अद्यापही झालेल्या नाहीत त्यांच्या देखील बदल्या त्वरित कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी महाराष्ट्रा राज्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन केली आहे. अशा आशयाचे निवेदन देखील त्यांनी महसुल मंत्री यांना दिले असल्याची माहिती मांढरे-पाटील यांनी दिली.
