करमाळासोलापूर जिल्हा

प्रा. डॉ. मच्छिन्द्र नागरे यांना ज्ञानप्रबोधिनी प्रयोगशील शिक्षक पुरस्कार जाहीर

संजय साखरे – प्रतिनिधी 

श्री उत्तरेश्वर ज्यु कॉलेज केम येथील प्रा. डॉ. मच्छिन्द्र नागरे यांना शिक्षण क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित असा ज्ञानप्रबोधिनी प्रयोगशील शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कार प्रकिया मध्ये पहिल्या फेरीत एकूण पन्नास शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. त्यातून दुसऱ्या फेरीसाठी एकूण दहा शिक्षकांना नामांकन मिळाले होते. शेवटी झालेल्या अंतिम फेरीत उत्तरेश्वर ज्यु. कॉलेजच्या वेगवेगळ्या उपक्रमशील प्रयोगामुळे ही निवड झाली.

या पुरस्कार निवड समितीने अत्यंत पारदर्शक पद्धतीने काही निकष ठरविले होते. उत्तरेश्वर संस्कृती केंद्रात दर शनिवारी राबवित असलेले सांस्कृतिक उपक्रम, निबंध -भाषण -लेखन उपक्रम, सर्वात महत्वाचे म्हणजे दरवर्षी घेत असलेले शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे साहित्य संमेलन, स्वच्छता अभियान, आरोग्य आपल्या दारीं, जागर नवदुर्गाचा, वाचन कट्टा हे सर्व उपक्रम या निवड समितीला खूप आवडले. ज्ञान प्रबोधिनी चे प्रमुख मा.प्रसाददादा चिक्षे व ज्ञान प्रबोधिनी छात्र प्रबोधन मासिकाचे संपादक श्री महिंद्र सेठिया यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

या पुरस्कार निवडी बद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे , सचिवा प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे, प्रशासन सहसचिव प्राचार्य डॉ. युवराज भोसले, अर्थ सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, मराठवाडा विभाग प्रमुख आणि आजीव सेवक व प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, मा सहसचिव प्राचार्य डॉ. अशोक कारंडे, प्राचार्य विष्णू पाटील, निवड झाल्याबद्दल केम गावामध्ये श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम या ठिकाणी प्रा. मच्छिंद्र नांगरे सर यांचा सत्कार करण्यात आला .सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अनिरुद्ध कांबळे, मा. श्री अजितदादा तळेकर, प्रहार संघटना अध्यक्ष श्री संदीप तळेकर, प्रहार संघटना करमाळा संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार ,शालेय समिती अध्यक्ष श्री मोहन दोंड, प्राचार्य कदम सर, अमोल तळेकर सर, साळुंके सर, कोंडलकर सर, एन डी तळेकर सर, मोमीन सर, घुगे सर, कुंभार सर .नरखेडकर मॅडम कुंभार मॅडम ,तळेकर सर ढोबळे सर व इतर कर्मचारी व शिक्षक ग्रामस्थ, सर्व विवेकानंद परिवार यांनी प्रा. डॉ. नागरे यांचे अभिनंदन केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE