कुंभारगाव मध्ये जेष्ठ नागरिकांचे लसीकरण
प्रतिनिधी – संजय साखरे
कुंभारगाव ता करमाळा येथे ६० वर्ष वयाच्या पुढील जेष्ठ नागरिकांचे कोविड लसीकरण पार पडले. यामध्ये मधुमेह, बी.पी यासारखे व तत्सम दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींना लस देण्यात आली.

महाभयंकर कोरोना रोगाची दुसरी लाट अधिक तीव्रतेने गतिमान होत असताना ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.त्यामुळे गावचे सरपंच श्री महेंद्र पानसरे यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य खात्यामार्फत गावातच लसीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अशा ज्येष्ठ नागरिकांचे व दुर्धर आजार असणार्या व्यक्तींचे लसीकरण कुंभारगावमध्ये घेण्यात आले.
हा लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंभारगाव चे तरुण नेते खुळे पाटील तसेच कुंभारगाव चे उपसरपंच बाळू गलांडे व गावातील तरुण वर्गाचे सहकार्य लाभले असल्याचे सरपंच श्री महेंद्र पानसरे यांनी सांगितले.
