करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अपघाताला जबाबदार पिकअप चालकावर गुन्हा दाखल ; एक ठार चौदा जखमी

करमाळा समाचार

विवाहकार्य आटपुन आपल्या मूळ गावी माघारी जात असताना करमाळा तालुक्यातील कोर्टी – विहाळ रस्त्यावर पिकअप चालकाचा अंदाज चुकल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या दुसऱ्या ट्रॉलीला बाजुने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार तर १४ जण गंभीर जखमी झाले आहे. यातील जखमींवर प्राथमिक उपचार करून चौघांना पुढील उपचारासाठी बाहेर पाठवण्यात आले आहे. सदरचा अपघात बुधवारी सायंकाळी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पिकअप चालक अमोल बिडवे रा. हिंगणगाव ता. परांडा जिल्हा धाराशिव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात सुरेखा बारीकराव उबाळे (वय ६५) वर्ष रा. अंबी ता. भुम या जागीच ठार तर सिराज नूर मोहम्मद शेख (वय ३०), प्रकाश भोसले (वय ६०), शिवाजी रामभाऊ भोसले (वय ४५), सुमन मुरलीधर गटकल (वय ५०), बाबासाहेब गोरख गटकल (वय ३५), राजुबाई सौदुराम गटकल (वय ६०), पोपट मल्हारी भोसले (वय ७३), सविता रामदेव भोसले (वय ७०), दादा राजू भोसले (वय ७५), संगीता आबासाहेब भोसले (वय ५०), इब्राहिम अब्दुल शेख (वय ५०), सुनील शंकर भोसले (वय ४५), कीर्ती शिवाजी भोसले (वय १८), सुरेखा शिवाजी गटकल (वय ४५) सर्व रा. अंबी ता. भुम अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहीती अशी की, सदरचे वर्हाड हे आळंदी येथे लग्नकार्यासाठी गेले होते. माघारी आपल्या मूळ गावी जात असताना वीट – विहाळ रस्त्याच्या दरम्यान आल्यानंतर विना क्रमांकाचा उसाचा ट्रॅक्टर समोरून जात होता. यावेळी सदर ट्रॅक्टरच्या पाठीमागे दोन ट्रॉली असल्याने पिकअप (क्रमांक एम. एच. २५ ए. जे. ४६९७) चालकाला याचा अंदाज आला नाही. चालकाने समोरुन येत रस्त्याच्या उजव्या बाजुने टॅक्टरच्या बाजुने घेतली व एकच ट्रॉली समजुन अचानक डावी कडे गाडी वळवली. त्यावेळी सदरची गाडी ही दुसऱ्या ट्रॉलीवर जाऊन आदळली. यावेळी संपुर्ण गाडीचा चुराडा झाला. यावेळी करमाळा शहरातील काही मंडळी प्रवास करीत होते. त्यामध्ये किरण जाधव व परिसरातील ग्रामस्थ वेळीच पोहचले. त्यांनी त्या लोकांना बाहेर काढुन रुगवाहीकेत दवाखान्यात पाठवले. त्यांच्यामुळे तातडीने करमाळ्यातील यंत्रणा कामाला लागली. जखमी करमाळ्यात आल्यानंतर जगदिश अगरवाल यासह सामाजिक कार्यकर्ते जखमींना बाहेर काढण्यात मदत करण्यात सहकार्य केले. यावेळी अनोळखी लोकांच्या मदतीला धावलेल्या करमाळावासियांमुळे जखमीवर लवकर उपचार करता आले. यातील एक आठरा वर्षाची मुलगी अत्यंत गंभीर जखमी झाली असुन तिलाही इतर तीघांसह बाहेर उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर इतर दहा जखमींवर उपचार करुन त्यांना सोडण्यात आले. तर दोन्ही गाड्यांचे चालक रात्रीच फरार झाल्याची माहीती देण्यात आली.

एकाच रस्त्यावर दुसरा मोठा अपघात बुधवार ठरला अपघात वार….
कोर्टी आवाटी रस्त्याचे नुकतेच काम पूर्ण झाले आहे. सदरचा रस्ता मोठा व नवा असल्यामुळे या ठिकाणाहून वाहने भरधाव वेगात वाहत असतात. त्याचा फटकाही आता बसताना दिसू लागला आहे. पहाटे कर्नाटक भागातील भाविक प्रवासी शिर्डी कडे जात असताना या रस्त्यावरील पुर्व भागातील पांडे परिसरात अपघात झाला. त्यामध्ये चार तर रात्री रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला म्हणजेच विहाळ परिसरात झालेल्या अपघातात एक असे एकूण पाच ठार झाले. तर दोन्ही मिळून तब्बल २० प्रवासी जखमी झाले आहेत. सदरचा दिवस हा अपघात वार ठरला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE