हर्षाली विनय ननवरे यांच्या सरपंच पदाच्या वर्षपूर्ती निमित्त विविध कार्यक्रम
करमाळा
मौजे बोरगाव ता. करमाळा या ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच (सॅाफ्टवेअर इंजिनियर) हर्षाली विनय ननवरे यांच्या सरपंच पदाच्या वर्षपूर्ती निमित्त बोरगाव ग्रामपंचायतच्या वतीने मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील कुटूंबाना पिण्याच्या पाण्याचा जार व कचरा पेटी(डस्टबिन) चे मोफत वाटप करण्यात आले.

याशिवाय गावातील शासकीय व निमशासकीय सेवेतून सेवा निवृत्त झालेल्या प्रतिष्ठीत व्यक्तीचा व सेवा निवृत्त झालेल्या नागरिकांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करुन भेटवस्तू देण्यात आली. तसेच गावातील गुणवंत विध्यार्थ्याचा ट्रॉपी देऊन सन्मान केला.
हा क्रार्यक्रम करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने व सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे, राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाक जमादार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आजी-माजी पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ति यासह ग्रामस्थ मोठया संख्येंने उपस्थित होते.

