तालुक्यात बदल दिसतोय ; रुग्णसंख्या घटली
करमाळा समाचार
करमाळा ग्रामीण मध्ये आज एकूण 61 घेण्यात आल्या. त्यामध्ये नवे तीन बाधित मिळून आले आहेत. त्यामध्ये एक पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. हे हे तीनही रुग्ण देवीचामाळ येथे आढळून आले आहेत. इतर भागातही टेस्ट घेण्यात आल्या पण त्या ठिकाणी रुग्ण बाधित आढळले नाहीत. ही एक चांगली बाब समोर येत आहे.

आज तालुक्यातून बाधीतांपैकी 18 जण सोडल्याने हा आकडा 1920 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर 126 जणांवर उपचार सुरू आहेत. आज पर्यंत 2073 एकूण बाधित मिळून आले होते.

करमाळा शहरात प्रत्येक प्रभागात कोविड चाचणी होत आहे. त्यानुसार तालुक्यातील तसेच करमाळा शहरातील ही रुग्ण तपासण्याचे काम सुरू आहे. आज ग्रामीण भागात तपासण्या झाल्या परंतु शहरात तपासणी झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे उद्या पुन्हा येथील आंबेडकर प्रशालेत पुढील तपासण्या होतील. त्या ठिकाणी लक्षणे असणाऱ्या संशयित व्यक्तींनी जाऊन तपासणी करून घेणे गरजेचे आहे.