करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

खराब रस्त्यासाठी आज तीन गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपोषण करणार

करमाळा समाचार

अत्यंत खराब परिस्थितीत असलेल्या हिवरवाडी रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती केली जात नाही. त्या निषेधार्थ आज हिवरवाडी, वडगाव, भोसे येथील ग्रामस्थ व विद्यार्थी हे आमरण उपोषण करणार आहेत. सकाळी दहा वाजता तहसील परिसरात सर्व जमा होतील.

तालुक्यातील नेतेमंडळींकडून काम होत नसल्याने आता थेट शासनाकडे दाद मागण्यासाठी विद्यार्थी आता प्रशासनाच्या दारात घेऊन बसले आहेत.

करमाळा हिवरवाडी वडगाव या मार्गाची अत्यंत दयणीय अवस्था झालेली आहे. सदरील रस्त्यासाठी वेळोवेळी प्रशासन व सरकार मधील नेते मंडळींकडे पाठपुरावा करून देखील सदरील रस्त्याची काम होत नाही. त्यामुळे हिवरवाडी, वडगाव, भोसे येथील ग्रामस्थ विद्यार्थी आमरण उपोषणासाठी बसणार आहेत.

ads

सदरच्या विद्यार्थ्यांचा त्रास लक्षात घेता तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी समोर येत विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

 

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE