करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

जेऊर येथुन ट्री गार्ड चोरी ; माहिती देण्याचे आवाहन

करमाळा समाचार

जून 2018 साली भारत हायस्कूल जेऊर च्या सन 1994 च्या दहावी बॅच च्या मुलांनी एकत्रित येत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रामुख्याने भारत मंजुळे याने कल्पना मांडली आणि मधुकर बांदल, सुहास डांगे, महावीर मंडलेचा,विवेक लबडे, सुनील तोरमल, भालचंद्र निमगिरे यांनी हिरीरीने सहभाग घेतला. याला दहावी 1998 बॅच च्या मुलांनी अर्थ सहाय्य सहभाग घेतला. यामध्ये संतोष नुसते, दिलीप निमगिरे, तुषार पिसे इ.सहभाग होता.

त्यांचा ऑस्ट्रेलियातील मित्र वृक्षप्रेमी हनुमंत जगताप यांनी भरघोस आर्थिक मदत दिलीच शिवाय त्यांच्या छोट्या भावाला, गणेश ला पाण्याचा टँकर ने पाणी देण्यास सांगितले.या सर्व प्रक्रियेत जेऊर मधील सिनियर मंडळींनी देखील आर्थिक हातभारासह मार्गदर्शन केले. यामध्ये माजी आमदार नारायण पाटील, डॉ.सुभाष सुराणा, प्रा.अरविंद दळवी,dr.देशपांडे,जनता बँक, शांतराम सुतार, पंडित , नागेश झांझुर्णे, संदीप कोठारी, दिनेश देशपांडे, कल्याण साळुंखे, राजेंद्र जाधव, सूर्यकांत मोहिते कुलकर्णी गुरुजी ,शरद आरकिले इ.खूप मान्यवरांचे सहकार्य लाभले.मुक्ता इंटरप्रायझेस चे सचिन पवार यांनी “आम्ही वृक्षप्रेमी” WhatsApp group तयार करून सर्व झाडांची निगा राखण्याचे उत्कृष्ट काम करत आहेत. ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमोडे व ग्रामसेवक कुदळे मोटार देऊन पाण्याची सोय केली.सुहास गायकवाड यांनी करमाळा पंचायत समिती चे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या सहकार्यानेही वृक्षारोपण केले.

अशा प्रकारे वृक्षारोपण ही एक चळवळ तयार होऊन सुमारे 167 झाडांची लागवड होऊन 148 झाडे सध्या दिमाखात उभी आहेत.मुळातच वृक्षारोपण करताना 10 ते 15 फूट उंच झाडे,कलर व नावासह ट्री गार्ड आणि वर्षभर पाण्याची सोय अशी व्यवस्था करुन लागवड केली जाते.त्यामुळे रोप/ झाड जळण्याचे प्रमाण नगण्य.

असे असले तरी काही समाजविघातक शक्ती चा वृक्षारोपण ला फटका बसत आहे.खोल रोवलेली ट्री गार्ड झाडांचे नुकसान करून चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत सहा ट्री गार्ड चोरीला गेली आहेत. चोरीला गेलेली ट्री गार्ड मिळावीत तसेच या पुढे अशा घटना घडू नयेत यासाठी जेऊर सह आजूबाजूच्या गावातील तरुणांना सहकार्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.लोकवर्गणीतून वृक्षारोपण च्या चांगल्या चाललेल्या कार्यात समाजविघातक लोक किरकोळ स्वार्थासाठी हानी पोहोचवत असतील तर ही दुर्दैवाची बाब आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE