वरातीत नाचण्याच्या कारणातुन दोन गटात तुंबळ मारामारी ; चार जण जखमी
प्रतिनिधी- करमाळा समाचार
वरातीत नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटले असून शुक्रवारी सकाळी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये तब्बल चार जण जखमी तर आठ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. सदरची भांडणेही पाडळी तालुका करमाळा येथे एका लग्नाच्या वरातीत किरकोळ वादातून झाल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी श्रीहरी पिंपळे व वायकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 29 मार्च रोजी सकाळी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गावडे चौक येथे भैरू गावडे यांच्या लग्नाच्या वरातीत नाचत असताना समाधान वायकर व भैय्या चोरमुले या दोघांमध्ये साधारण बाचाबाची झाली होती. त्यानंतर त्या बाचाबाची चा राग मनात धरून दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी या दोन्ही गटात जबर मारहाण झाली.

पहिल्या फिर्यादीच्या अनुषंगाने तात्या तुकाराम वायकर, समाधान वायकर, महारुद्र वायकर सर्व रा. पाडळी ता. करमाळा परशुराम उबाळे रा. चोंडी जामखेड तर दुसर्या फिर्यादीनुसार किसन पिंपळे, विशाल पिंपळे, आकाश पिंपळे, शोभा पिंपळे सर्व रा. पाडळी ता. करमाळा यांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.