अर्बन बॅंकेच्या पंधरा जागांसाठी आज मतदान ; विरोधीगटाकडुन उरले सहा उमेदवार
करमाळा समाचार
शहरातील नावाजलेली दि करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड करमाळा याची पंचवार्षिक निवडणूकीची आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत सदरची प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण १५ जागांसाठी २१ उमेदवार मैदानात उभे ठाकले आहेत. तर करमाळा भूषण गिरधरदासदेवी प्रणित नागरिक संघटना जनहित पॅनलचा एक उमेदवार अविरोध होण्याच्या मार्गावर आहे. सदरच्या बँकेवर नागरिक संघटनेची एक हाती सत्ता राहिलेली आहे.


कोरोना काळात बँकेने अपेक्षेप्रमाणे कर्ज प्रकरणाची वसुली न केल्यामुळे थकबाकी २५ कोटी पेक्षा जास्त दिसू लागली व बँक तोट्यात आल्यानंतर रिझर्व बँकेने बँकेवर निर्बंध लावले. यामुळे ठेवीदारांना रक्कम माघारी देण्यास अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे बँक बंद पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पुन्हा एकदा वसुली व्यवस्थित झाल्यानंतर बँकेवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत व बँक पुन्हा एकदा सुरळीत सुरू असल्याचे दिसत आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रमुख विरोधी गट दिसुन येत नाही. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून उमेदवार नशीब आजमावत आहेत. विरोधी गटाकडून संपूर्ण पॅनल उभा होऊ शकला नाही. तर देवी प्रणित नागरिक संघटना जनहित पॅनल यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचा दिसून येत आहे. नागरिक संघटना वगळता सात उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यातील एक नंदनी घोलप यांनी माघार घेऊन नागरिक संघटनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सदरची निवडणूक ही एकतर्फी असल्याचे दिसून येत आहे.
महात्मा गांधी विद्यालय करमाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंदर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केतुर या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
गोरख जाधव अविरोध ...
नागरिक संघटना जनहित पॅनल कडून कन्हैयालाल देवी, अनुज देवी, सुनील घोलप, कलीम काझी, जितेश कटारिया, यशराज दोशी, मोहिनीराज भणगे, अभिजीत वाशिंबेकर, प्रकाश सोळंकी, ताराबाई क्षीरसागर, मीना करंडे, प्रमिला जाधव, चंद्रकांत चुंबळकर, वंदना कांबळे हे मैदानात आहेत. तर भटक्या विमुक्त जाती जमाती मधून गोरख मच्छिंद्र जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
घोलप यांची माघार …
तर विरोधी गटातील दिलीप गानबोटे, मलिक पिंजारी, सदाशिव वाघमारे, चंद्रशेखर घोडेगावकर, मलिक पिंजारी, ब्रह्मदेव लोंढे व नंदिनी घोलप हे उभा आहेत यांच्यापैकी नंदनी घोलप यांनी जनहित पॅनलला पाठिंबा दिला आहे.