‘यांनी’ पाठपुरावा केला म्हणुन रस्त्याला मजुरी ; पालकमंत्र्यांनी केला खुलासा
करमाळा – संजय साखरे
सोलापूर आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या डिक सळ येथील जुना रेल्वे पूल ते डिकसळ गाव तालुका इंदापूर यांना जोडणाऱ्या दोन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे शुभारंभ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

करमाळा तालुक्यातील कोर्टी ते टाकळी पर्यंतचा रस्ता हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झाला आहे . टाकळी ते डिकसळ पूल या रस्त्याचे ही डांबरीकरण पूर्ण झाले आहे. मात्र तेथून पुढे दोन किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब होता. त्यामुळे वाहनधारकांना या मधून वाहन चालविताना खूप मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत होती. पावसाळ्यामध्ये उजनी जलाशयाचे पात्र पूर्ण भरल्यानंतर लाटांचे पाणी या रस्त्यावर येत होते. त्यामुळे यावर मोठ्या प्रमाणावर चिखल होत होता.

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून पुण्याला जाणारी सर्व वाहने याच मार्गावरून ये-जा करतात. त्यामुळे हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. याशिवाय ऊस वाहतूक करणारी वाहने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात.
या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी बारामती ॲग्रो चे अध्यक्ष श्री राजेंद्र दादा पवार यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला. म्हणून हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असेही नामदार भरणे म्हणाले.
यावेळी बारामती ऍग्रो चे अध्यक्ष श्री राजेंद्र दादा पवार , सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष श्री सुभाष आबा गुळवे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य सविता देवी राजे भोसले, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ, करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री संतोष वारे यांच्यासह या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.