सोलापूर जिल्ह्याच्या हिश्श्याचे पाणी कुठेही जाऊ देणार नाही – ना. जयंत पाटलांचे आश्वासन
करमाळा समाचार
जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी जलाशयातील पाण्यावरून चालू असलेल्या राजकारणाला आज आखेर पूर्णविराम मिळाला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित आदेश सोलापूरच्या यशाचे पाणी कुठेही जाणार नाही अशी ग्वाही दिल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.

करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे व मोहोळ चे आमदार यशवंत माने तीनही आमदारांनी या संबंधित जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. शिवाय जिल्ह्यातील सर्वच भागातील नेते मंडळीनी आंदोलने करुन सरकारचे लक्ष वेधले होते.
22 एप्रिल 2019 रोजी उजनी जलाशयाच्या उजनी उर्ध्वबाजुस बिगर सिंचन पाणी वापरातुन उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून उचलून शेटफळगडे येथे नवनी मुठा उजवा कालव्यात किमी 161 ते सोडून खडकवासला प्रकल्पाचे सिंचन स्थिरीकरण करणेबाबत एक आदेश काढण्यात आला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे राजकारण तापले होते.
