करमाळासोलापूर जिल्हा

जिल्ह्यातील नऊ नायब तहसीलदारांच्या बदल्या ; गायकवाड पुन्हा करमाळ्यात

करमाळा समाचार

सोलापूर जिल्ह्यातील नऊ नायब तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. याशिवाय इतर जिल्ह्यातील तीन नायब तहसीलदार सोलापुरात आले आहेत. याबाबत आदेश 25 मे रोजी निघाला. राज्यातील 58 नायब तहसीलदारांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत. त्यात सोलापुरातील नऊ जण तर इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात तीन आलेल्या नायब तहसीलदारांचा समावेश आहे.

यामध्ये काही दिवसांपूर्वी करमाळ्यातून कोल्हापूर येथे गेलेले बाबासाहेब गायकवाड यांचाही समावेश आहे. तर करमाळ्यातून सुभाष बदे हे बार्शी येथे बदली होऊन गेले आहेत.

तुषार देशमुख – माळशिरस ते फलटण
सुधाकर धाईंजे – मंगळवेढा ते मोहोळ,
राजाभाऊ भंडारे- माळशिरस ते खटाव,
प्रवीण घम- सोलापूर ते सोलापूर निवडणूक शाखा,
बसवंत कोळी – सांगोला ते मोहोळ,
एस. व्ही. बदे – करमाळा ते बार्शी,
अनिल निराळी- सोलापूर ते पुणे,
अनिल गवळी- सोलापूर ते सांगली,
सुबोध विध्वंस- मोहोळ ते सातारा,
संतोष सानप- पुणे ते मंगळवेढा,
प्रवीण सुळ इंदापूर ते माळशिरस,
बाबासाहेब गायकवाड कोल्हापूर ते करमाळा .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE