तुमच्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही ; वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या भुमिकेवरुन ग्रामस्थ नाराज
करमाळा समाचार
नागरिकांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र याबाबत वरिष्ठांना अहवाल दिला जाईल, खबरदारी म्हणून येथे कॅमेरा बसवला जाणार असून नियंत्रणासाठी काही कर्मचारी ठेवले जाणार असल्याचे वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके यांनी नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पण ग्रामस्थ समाधानी नसुन आम्हाला फुकटच्या सल्ल्याची नव्हे तर कार्यवाहीची गरज असल्याचे बोलले.

तालुक्यातील मांगी व पोथरेच्या परिसरात वनविभागाच्या पथकाने पहाणी केली. ठस्यांच्या निरीक्षण करून परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काल सायंकाळी प्रीतम माळी यांना मांगी हद्दीतील आंनद बागल यांच्या गट नंबर १६ मध्ये बिबट्या दिसला होता. त्यानंतर आज (शनिवारी) येथे मोहोळ येथून वनविभागाचे पथक आले होते. वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके यांनी नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुळातच तालुक्यात यापुर्वी बराच बेळा बिबट्याने दहशत माजवलेली आहे. अशा परिस्थितीत तरस असल्याचेही कारणे वनविभागाने दिलेले आहेत. पण खरच तो तरस होता बिबट्या हे समजले नाही. बऱ्याच ठिकाणी त्याचा वावर असतो. त्या ठिकाणी बिबट्या लोकांवर हल्ला हे करत नाही. पण त्या भागात मोठ्या प्रमाणावर बिबट्या हा प्राणी सर्रास आढळतो. त्याच्यापासून इतरांना व त्याला इतरांपासून धोकाही नसतो. त्यामुळे तो हल्ला करत नाही. परंतु आपल्या भागात बिबट्या दिसल्यानंतर लोक घाबरून जातात. तर काही त्याच्यावर हल्ला करतात. त्याच्यातून बचावण्यासाठी तो लोकांवर हल्ला करू शकतो. यातून लोकांना जीवितहानी व जनावरांच्या माध्यमातून आर्थिक हानीचा सामना करावा लागत आहे.
जरी माणसाला बिबट्यापासून कोणताही धोका नसला तरी काहीच होणार नाही याचीही जबाबदारी वन विभाग घेणार आहे का ? जर तशी जबाबदारी घेऊ शकत नसतील तर बिबट्या ज्या भागात आहे. तिथे त्याला पकडण्याची कार्यवाही का केली जात नाही.
गेल्या 15-20 दिवसापासून बिबट्याचा वावर जातेगांव, पोथरे, मांगी परिसरात जाणवत आहे. काल बिबट्या पोथरे मांगी परिसरात लोकांना दिसल्याने परिसरातील गावात एकच खळबळ उडाली आहे. लोकांना शेतीची कामे करण्यासाठी शेतात जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे आहे. वन विभाग मात्र बिबट्याला जेरबंद करण्याचे सोडून लोकांना सतर्क राहण्याचा फुकटचा सल्ला देऊन मनुष्यहानी होण्याची वाट पाहत आहे का ? असा सवाल भाजपाचे नितीन झिंजाडे यांनी केला आहे.