चाळीस वर्षीय पुरुषाचा रेल्वे धडकेत मृत्यु ; ओळखीचा असेल तर पोलिसांशी संपर्क साधा

करमाळा समाचार (karmalasamachar)

करमाळा तालुक्यात रामवाडी येथे रेल्वे पटरी जवळ एक अनोळखी पुरुषाचा अपघात झाला आहे. त्याची ओळख पटत नसून संबंधित व्यक्ती 40 वर्षे वयोगटातील असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदरचा अपघात 23 जानेवारी रोजी घटना त्याचा उपचारादरम्यान दुपारी तीन वाजता मृत्यू झाला आहे.

23 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या समोर रामवाडीत ता. करमाळा गावच्या शिवारात रेल्वे की.मी. दगड 305/ 2-3 जवळ एक अनोळखी पुरुष जातीचे वय अंदाजे 40 वर्षाचे वयोगटातील इसम हा रेल्वे धडकून जखमी झाल्याने त्यास उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे दाखल केले. तो दुपारी तीनच्या सुमारास मयत झाला आहे.

याचा पोलीस शोध घेत असताना सदरची माहिती मिळाली नाही. सदर व्यक्तीच्या डोक्यावरील केस कापलेले आहेत. खाकी रंगाचा शर्ट व पॅन्ट, तपकिरी रंगाचा पट्टा, तपकिरी रंगाचा चेन बूट, निळ्या रंगाची अंडरवेअर इत्यादी ओळख आढळून आली आहे. तरी संबंधित व्यक्ती च्या वर्णनावरून करमाळा पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन हवालदार श्रीकांत हराळे यांनी केले आहे.

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!