करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

… त्यावेळी तुमचे हात कुठे गेले होते ? – मराठा सेवासंघाचे तालुकाध्यक्ष काळे यांचा सवाल

राज्याचे कृषिमंत्री विधानसभा सभागृहात रमी खेळतात. त्याविरोधात प्रतिकात्मक आंदोलन यांना चालत नाही. पण लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर सारखे लोक जेव्हा अजितदादावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात तेव्हा यांचे हात कुठे गेलेले असतात…? असा सवाल करीत राज्याचे कृषिमंत्री विधानसभा सभागृहात रमी खेळतात. त्याविरोधात प्रतिकात्मक आंदोलन यांना चालत नाही गरीब मराठा तरुणांना मारहाण करून मर्दानगी दाखवता का…? कुठल्याही प्रकारची चुकीची भाषा न करता ही जाणीवपूर्वक खोटे आरोप करण्याच काम राष्ट्रवादीचे लोक करत आहेत. पण विजयकुमार घाडगे पाटलांना झालेल्या मारहाणीचा बदला येणाऱ्या काळात निश्चित घेतला जाईल असा इशारा मराठा सेवासंघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे यांनी दिला आहे.

छावा मराठा युवा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मागील अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. आज लातूरमध्ये खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन म्हणून त्यांच्यासमोर पत्ते फेकले व माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे निवेदन दिल्यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली मारहाण निषेधार्थ आहे. मराठासेवक विजयकूमार घाडगे पाटलांना तुमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण समाज कायम लक्षात ठेवेल असेही काळे म्हणाले.

मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर हल्ले होताना दिसून आले आहे त्यामध्ये हल्ले करणारेही मराठाच असल्याचे दिसून आले आहे. परंतु राजकीय हेतूतून सदरच्या घटना घडताना दिसत आहेत. यामध्ये मराठा समाजाची बदनामी होत आहे. तर यापूर्वी वेगवेगळ्या गटाच्या व पक्षाच्या नेत्यांनी महापुरुषांची बदनामी केली त्यावेळेस मात्र सदरचे लोक मुग घेऊन गप्प होते. कोणीही कसलाही विरोध करताना दिसून येत नव्हते. परंतु ज्यावेळी आता मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. त्यावेळी मात्र यांना राग येत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय यापूर्वी महापुरुषांची बदनामी झाली तरी अपेक्षित असा राग दिसून आला नाही. पण राजकीय हेतूने प्रेरित संभाजी ब्रिगेडचे प्रमुख गायकवाड यांच्यावर मात्र शाई फेक करण्यात आली ही बाब अत्यंत खेदजनक असून याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे असेही काळे म्हणाले.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE