करमाळ्याचे पाणी मुरतंय कुठ ? ; संतप्त नागरीक मतदानावर बहिष्कार टाकणार
करमाळा समाचार
पाच दिवसांपासून पाणी येत नसल्याची तक्रार करत रंभापुरा येथील महिला व पुरुष हे नगरपालिकेवर पोहोचले आहेत. तर आज रविवार असल्याने नगरपरिषद बंद आहे. पण तरीही लोकांची गैरसोय होत आहे हे पाहून एकही कर्मचारी अध्यापपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये अधिकच रोष निर्माण झाला आहे. तर पाणी योग्य पद्धतीने चालू झाले नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा यावेळी रंभापुऱ्याच्या नागरिकांनी दिला आहे.

मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी दुबार पंपिंग करून करमाळ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते सदरचे पाणी करमाळ्या पर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे व वेळेवर नागरिकांना दिले जात आहे. पण तरीही नागरिकांना पाणी पोहचत नाही अशी तक्रार नागरिक करीत आहेत. जर पाणी पोहोचत आहे तर मूरतय कुठे हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे.

शहरातील इतर भागात दोन तास पाणी पुरवठा केला जातो. पण आमच्या भागात केवळ अर्धा तास पाणी येते. मागील पाच दिवसांपासून आम्हाला पाणी मिळाले नाही अशा तक्रारी रंभापुर भागातील लोकांच्या आहेत. तर गावातील नागरिकांनाही पाणी मिळत नसल्याने त्यांच्याही तक्रारी आहेत. नेमकं पाणी तर करमाळ्यापर्यंत पोहोचते पण जातेय कुठे असे नागरीक जाब विचारु लागले आहेत.