करमाळासोलापूर जिल्हा

अदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत नवा आदेश ; भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाला स्थगीती

करमाळा – प्रतिनिधी

आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला ऋण वसुली संचालय यांच्यावतीने पुढच्या सुनवाई पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाडेतत्त्वावर आदिनाथ देण्यासंदर्भातील तूर्त तरी थांबलेली दिसून येणार आहे. तसेच यापूर्वी जी साखर 2867 रुपयांनी विक्री करण्याचा निर्णय घेतला होता तेही थांबून त्यापेक्षा वाढीव रकमेची जो साखर घेईल त्याला ती साखर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना मागील तीन ते चार वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या दरम्यान संचालक मंडळाच्या ठरावानुसार कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर बराच काळ गेला तरी कारखाना अद्याप सुरू न झाल्याने कारखान्याचे सभासद, शेतकरी व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. तर संचालकांनाही नेमके काय करावे हा प्रश्न होता. अशा परिस्थितीत मागील काही काळात एक समितीही तयार झाली होती की जी ने आपण कारखाना भाडेतत्त्वावर देऊ देणार नाही अशी भूमिका मांडली होती.

तर आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालवला गेला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर संचालक मंडळाने कारखाना सुरू करण्यासंदर्भात व भाडेतत्त्वावर न देण्याचा निर्णय घेऊन निर्देशन संचालन यांच्याकडे धाव घेतली. यावेळी संचालकांच्या बाजूने हा पहिला निकाल लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या संदर्भात स्थगिती देण्यात आले आहे.

असा मेसेज सोशल मिडियात व्हायरल …
ऋण वसुली संचांलय DRT Pune इनके द्वारा आज आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा जि सोलापूर को बारामती ऍग्रो लि , बारामती जि पुणे को किराये पर देने के लिए अगली सूनवाई तक स्थगिती (Stay) आदेश दिया गया हैं तथा आदिनाथ सहकारी की दो लाख क्विंटल चिनी २८६७/- रु प्रति क्विंटल को जो राज्य सहकारी बँक पुणे द्वारा बेची गयी थी उन्हे निर्देश दिया गया की अगर कोई चिनी खरेदीदार व्यापारी २८६७/- रु से अधिक दर देने के लिए तयार हो तो उसका विचार करे. आप सभी से अनुरोध हैं की अगर आप आदिनाथ सहकारी की चिनी २८६७/- प्रति क्विंटल से ज्यादा रेट पर खरेदी करने तयार हैं तो आपकी ऑफर निचे गये ईमेल पर तुरंत करे.

*[email protected]*
*[email protected]*
*[email protected]*
*[email protected]*

 

New order in the case of Adinath Sahakari Sugar Factory; Postponement of lease decision

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE