पहिले प्रकरण ताजे असताना गोवंश घेऊन जाणारी आणखी एक गाडी पकडली
करमाळा समाचार
चार दिवसांपूर्वी करमाळा तालुक्यात घेऊन जात असताना एक पिकअप पकडलेले प्रकरण ताजे असताना आता जिंती परिसरात एक गाडी पुन्हा एकदा पकडल्याची माहिती मिळत आहे. सदरच्या ठिकाणी गोरक्षकांनी सदर गाडी थांबवली. त्यावेळी त्यात कत्तलखान्याकडे घेऊन जात असलेले मृत जनावरे मिळाल्याची माहिती आहे.

मागील प्रकरणात 53 जनावरे ही जिवंत स्वरूपात घेऊन जात असताना आढळली होती. या प्रकरणात मात्र संबंधित जनावरे जागेवरच मारण्यात आल्याचे बोलले जात आहे. सदर ठिकाणी पोलीस पोहोचत आहेत.

यावेळी चालकाकडे चौकशी केली असता त्याने सर्वांना उडवाउडवी उत्तर देत आहे. परंतु सदर गाडी ही पुण्याच्या दिशेने जात होती अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर गाडी चालकाला संबंधित ठिकाणी थांबून ठेवण्यात आले आहे. यावेळी त्यासह आणखी एक व्यक्ती असल्याचे दिसत आहे.