करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होण्याआधी प्रशासनाला जाग येईल का ?

करमाळा समाचार 

अहमदनगर टेंभुर्णी महामार्ग रखडला आणि कमलाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मधोमध पुलाचे काम थांबले त्यावर उभारण्यात आलेल्या लोखंडी गंज ही चढला पण संबंधित विभागाला तो पुल किंवा त्यावरील ढाचा हे अडथळा ठरत आहेत किंवा त्याच्यापासून अपघाताचा धोका होऊ शकतो याच्याशी काही घेणं देणं दिसून येत नाही. गंज ढाच्यावर चढला की संबंधितांच्या बुद्धीवर हे कळून येत नाही.

करमाळा येथे कमलाभवानी यात्रेनिमित्त नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने करमाळा तालुक्यासह परिसरातील तालुक्यातून मोठ्या भक्ती भावाने भाविक येत असतात. त्या रस्त्यावरून जात असताना अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर करमाळा कमलाभवानी चौक या ठिकाणी एक रखडलेला पुल बऱ्याच दिवसांपासून असल्याने परिसरात बऱ्याच वेळा अपघातही झाले आहेत. यात्रा काळात त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असतो व वाहतूक सुरळीत केली जाते.

politics

परंतु सदरच्या पुलावर लोखंडी ढाचा व प्लाऊड काम रस्त्यावर पडून भाविक भक्तांसह येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा तसेच अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत वादळी वाऱ्यात किंवा पावसात सदरचे काम अंगावर पडल्यानंतर दुर्घटना होऊ शकते अशा पद्धतीची दुर्घटना झाल्यावर संबंधित विभागाला जाग येणार आहे का ? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. अशी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून संबंधित विभागाने त्या ठिकाणी दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE