करमाळा आगारात एस टी बस पायावर गेल्याने महिला जखमी
करमाळा समाचार
करमाळा येथे आगारात बसमध्ये चढत असताना एक महिला पडल्यामुळे बसच्या चाकाखाली तिचा पाय गेला. यावेळी झालेल्या अपघातात महिला गंभीर जखमी झाले असून तिला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

काही वेळापूर्वी स्वारगेट परांडा ही गाडी करमाळा आगारात पोहोचल्यानंतर लोकांची त्यामध्ये बसण्यासाठी झुंबड उडाली. यावेळी जागा धरण्यासाठी एक दांपत्य मागील बाजूस खिडकीपासून सामान आत टाकण्याचा प्रयत्न करत असताना लोकांचा धक्का लागून सदर महिलेचा पाय घसरला व तिच्या पायावरून गाडीचे चाक गेले. यावेळी महिला जखमी झाली. तिला तात्काळ लोकांनी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहे.
