करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

कुटुंबातील मंडळी घरात झोपलेले असताना धाडसी चोरी ; लाखाचा मुद्देमाल पळवला

करमाळा समाचार

आजकाल चोरांच्या धाडसी कृत्याचे प्रमाण वाढले आहे. आधी कधीतरी चोरीच्या घटना घडत होत्या. परंतु आता सर्रास चोरीच्या घटना घडताना दिसून येत आहेत. कधी दिवसा तर कधी मध्यरात्री या चोरी होऊ लागल्या आहेत. परंतु यातील चोर मात्र अद्यापही पोलिसांना मिळून येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशाच प्रकारची चोरीची घटना दिनांक 21 रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास वीट येथे घडले आहे.

वीट येथे सलूनचा व्यवसाय करणारे विलास राऊत हे कुटुंबासह जेवणखान करून झोपले होते. तर त्यांचे वडील राहत्या घरासमोर मोकळ्या जागेत एकटेच झोपले होते. दिनांक 21 मे रोजी रात्री एकच्या सुमारास दशरथ राऊत यांना घरामध्ये कशा तरी आवाज आल्याने ते जागे झाले. त्यावेळी घरामध्ये कोणीतरी असल्याबाबतची जाणीव त्यांना झाल्याने त्यांनी जोरात हाक मारली व बंद खोलीकडे आले.

त्यावेळी राऊत यांना तीन अनोळखी ईसम घरातील कपाटाचा दरवाजा उघडताना दिसले. त्यावेळी राऊत यांनी कोण आहे असे म्हणतात त्या अनोळखी इसमांनी तेथुन पळ काढला. ते पळुन जात असताना त्यापैकी एका इसमाचा वडिलांना धक्का लागल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला जखम झाली. त्यावेळी घराच्या स्लॅप वरती झोपलेले कैलास राऊत हे जागी झाले. त्यांनी तीघांना पळून जाताना पाहिले. त्यावेळी सर्वजण जागे झाले. घरातील सामानाची पाहणी केली असता घरातील साहित्य इतरत्र पडले होते. अनोळखी चोरट्याने घराच्या जिन्याचा वापर करुन मोकळ्या दरवाजातून घरात प्रवेश करून लबाडीने मुद्देमाल चोरून नेला आहे.

मुद्देमालात 65 हजार रोख रक्कम,नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याची काळे मणी असलेले गंठण, बारा हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे कर्णफुले व एक ग्रॅम वजनाची धातूची नथ असे एक लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून पळून गेले आहेत. याप्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तीन अनोळखी व्यक्तींचा तपास घेत आहेत. सदर प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक प्रवीण साने हे करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE