केत्तूरच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली श्रीरामपूरच्या आमदारांची सदिच्छा भेट
केत्तूर (अभय माने)
पेडगाव (ता.श्रीगोंदा) येथील रहिवासी व सध्याचे 220 श्रीरामपूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन करमाळा येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून व पुढील राजकीय कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार हेमंत ओगले यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी निवास उगले, शहाजी पाटील, राजेश कानतोडे, राजाराम माने, विलास सोनवणे ,सुहास मिसळ, पांडुरंग कनिचे, रामहरी जरांडे, महेश महामुनी, सुभाष जरांडे, राजाराम ठोंबरे,सोपानदेव खोडवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.