करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

दोन दहशतवाद्यांना पकडल्यामुळे शेख यांना दहा लाखांचे पारितोषिक

चिखलठाण( बातमीदार)

करमाळा तालुक्यातील कोंढेज गावचे सुपुत्र पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवलदार बाला रफिक शेख यांना ‘अह उल सुफी’ या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवाद्यांना पकडण्यात महत्त्वाची कामगिरी बजावल्याबद्दल राष्ट्रीय तपास यंत्रणे कडून दहा लाख रुपयांचे रिवार्ड व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे.

पुणे शहरातील कोथरूड येथील शास्त्रीनगर पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये 18 जुलै रोजी बालारफी शेख आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना तीन संशयतांना दुचाकी चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. अधिक तपास केला असता त्यांच्याकडे जिवंत काडतुस, लॅपटॉप ,मोबाईल व इतर आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली होती. हे संशयित देश विधातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय असल्याने अधिक तपास केला असता हे दोघे राष्ट्रीय तपास यंत्रणेने फरार घोषित केलेले आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या आरोपींवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने दहा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. आशा या आरोपींना पकडण्यात यश मिळवून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी ए.सी. इंगवले पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी बाला रफिक यांच्यासह चार सहकाऱ्यांना पुणे येथील आयुक्त कार्यालयात दहा लाख रुपयांचे रोख रिवार्ड व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.

यावेळी साह आयुक्त रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त अरविंद चवरिया उपस्थित होते . त्यांच्या या सन्मानाबद्दल करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रांमधून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

फोटो ओळी:-कोंढेज ता करमाळा येथील पोलिस हवालदार बाला रफी शेख यांना दोन दहशतवाद्यांना पकडण्यात महत्त्वाची कामगिरी बजावल्याबद्दल रिवार्ड व पारितोषिक देताना पोलिस आयुक्त रितेश कुमार राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी ए. सी.इंगवले.सह आयूक्त रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त अरविंद चवरिया

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE