वाय.सी.एम. मध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिन ऑनलाइन साजरा
करमाळा समाचार –
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि करमाळा येथील जिल्हा उपरुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. कपिल भालेराव ( एच.आय. व्ही. समुपदेशक) यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. प्रसंगी कपिल भालेराव म्हणाले की कोविड १९ च्या या संकट काळामध्ये युवकांची जबाबदारी मोठी आहे.कोरोनाशी लढताना तरुणांनी सतर्क राहून आपले कुटुंब व समाज यांना धीर देऊन स्वच्छतेचे नियम पटवून दिले पाहिजेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य केले पाहिजे.

यावेळी रा. से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रमोद शेटे यांनी मार्गदर्शन केले आपल्या मनोगतामध्ये प्रा.शेटे म्हणाले की,जागतिकीकरणाच्या रेट्यात संघर्ष करणाऱ्या तरुणांनी विचलीत न होता उत्तम आरोग्य , शिक्षण, रोजगार तसेच संशोधन आणि उद्योजकता या बाबीकडे लक्ष देऊन करिअर करावे .आंतरराष्ट्रीय संघटनेचे देखील हेच धोरण आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकासास चालना मिळत असल्याने अधिकाधिक महाविद्यालयीन विद्यार्थानी रा. से.यो. मध्ये सहभागी व्हावे