करमाळासोलापूर जिल्हा

निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची युवासेनेची मागणी

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद निधीमधून वीट ते देवळाली चे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालू असून सदर कामाची चौकशी होण्याची मागणी करमाळा युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती करमाळा यांना लेखी पत्राद्वारे केलेली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना गायकवाड यांनी सांगितले की, वीट ते देवळाली या रस्त्याचे काम ठेकेदार हे इस्टिमेट प्रमाणे करीत नसून सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालू आहे. सदर कामाची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी करण्यात यावीचौकशी अंती सदर कामाचा एकही रुपया ठेकेदारांना अदा करण्यात येऊ नये अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

तसेच हे निकृष्ट दर्जाचे काम होताना अधिकारी वर्गाला दिसत नसून ते झोपा काढत होते का किंवा त्यांचा या निकृष्ट दर्जाच्या कामाला छुपा पाठिंबा आहे का ? असा संतप्त सवाल यावेळी गायकवाड यांनी उपस्थित केला.

सदर पत्राच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व मुख्य कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांना पाठविण्यात आल्या आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE