जिल्हा परिषद अध्यक्ष कांबळे व रश्मी बागल आले एकत्र; निमित्त शिवसेनेच्यावतीने आरोग्य शिबीराचे आयोजन
करमाळा समाचार
करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने केम येथे शिवसेना प्रमुख, हिंदू ह्दयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आरोग्य शिबीर भरवण्यात आले होते.

या आरोग्य शिबीरासाठी करमाळा तालुका शिवसेना नेत्या रश्मी दिदी बागल, माजी जिल्हाप्रमुख तथा शिवसैनिकांचे मार्गदर्शक साईनाथ भाऊ अंभगराव, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख आशाताई टोणपे, प्रहारचे तालुकाध्यक्ष संदिप तळेकर, केम गावचे युवक नेते महावीर आबा तळेकर, शिवसेना तालुका उपप्रमुख श्रीहरी तळेकर, मकाईचे माजी संचालक गोरख जगदाळे, पिंटू रायचुरे, कव्हे गावचे तानाजी चोपडे, उत्तरेश्वर गोडगे, महिला आघाडी मतदारसंघ प्रमुख साधना खरात हे उपस्थित होते.

आरोग्य शिबीरांचे आयोजन शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वर्षाताई चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र केम यांच्या सहकार्याने केले होते. या आरोग्य केंद्रा मार्फत डाॅ अनिल खटके, डाॅ राऊत मॅडम, डाॅ पालखे यांनी या शिबीरासाठी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी आशा मोरे, मंगल कावळे, रोहिणी नागणे, राणी तळेकर, मनिषा दौंड, प्रियंका शिंदे, अंजना लोखंडे, सविता गावडे, सरस्वती कुर्डे, रंजना ओहोळ, रोहिणी तळेकर, मुजंळा पळसकर, सुरेखा पळसकर, हाशिना पठाण या उपस्थित होत्या.