केत्तुर येथे ५१ जणांनी केले रक्तदान
प्रतिनिधी – संजय साखरे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या औचित्य साधून व स्वर्गीय काकासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने केतुर नं- २ येथील श्री नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सध्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच रक्तपेढी यांना रक्ताची टंचाई जाणवू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर येथील युवकांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
सदर रक्तदात्यांचे रक्त संकलित करण्याचे काम बार्शी येथील श्री भगवंत रक्तपेढी यांच्या माध्यमातून करण्यात आले .याप्रसंगी श्री उदय सिंह मोरे पाटील, लक्ष्मीकांत पाटील, अजित विघ्ने,महानवर सर ,हरिचंद्र खाटमोडे पाटील, अशोक पाटील, संतोष पाटील ,कान तोडे सर ,प्रवीण नवले,सुहास निसळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वर्गीय काकासाहेब पाटील मित्र मंडळ व श्री किर्तश्वर मित्र मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
