गुळसडी गावासाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 1कोटी 44 लाख निधी मंजूर
करमाळा समाचार
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 1कोटी 44 लाखांसह विविध विकास कामांसाठी 29 लाख गुळसडी गावासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर केला आहे अशी माहीती माजी सरपंच मानसिंग खंडागळे यांनी दिली.

दर वर्षी उन्हाळ्यात गुळसडी गावातील ग्रामस्थांना होणाऱ्या पाणीटंचाई च्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार गुळसडी गावासाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 1कोटी 44 लाख निधी मंजूर केला आहे.

याचबरोबर गावाचे ग्रामदैवत व श्रध्दास्थान असलेल्या श्री काळभैरवनाथ मंदिरा समोर सभा मंडप साठी 7 लाख तसेच काळभैरवनाथ मंदिरा समोर व हजरत ताजुद्दीन बाबा पीर साहेब यांच्या दर्गा समोर पेविंग ब्लॉक साठी 5 लाख तसेच राम मंदिर खंडागळे वस्ती समोर सभा मंडप साठी 7 लाख व दलित वस्तीत रस्ता साठी 5 लाख व जाळे वस्ती येथे गुळसडी -कुंभेज रोडवर माऊली लोंढे यांच्या घरासमोरील पुला साठी 5 असे एकूण 29 लाख निधी मंजूर केला आहे असे माजी सरपंच मानसिंग खंडागळे यांनी सांगितले. एवढा भरीव निधी मंजूर केल्याबद्दल आमदार संजयमामा शिंदे यांचे संपूर्ण गुळसडी येथील ग्रामस्थांनी हार्दिक आभार व्यक्त केले.