वर्धापनदिनाच्या निमित्ताने पेंटर लोकांचा दहा लाखांचा विमा
समाचार टीम –
करमाळा १९ ऑगस्ट रोजी करमाळा येथील मुथा पेंट्स यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त यशकल्याणी सेवाभावी सदन येथे करमाळा शहरातील व ग्रामीण भागातील पेंटर्सचा दहा लाखाचा अपघाती इन्शुरन्स काढण्यात आला. यासाठी करमाळा पोस्ट विभागातून मोकाशे साहेब, कुलकर्णी सर, पंढरपूरचे कोकरे साहेब , नेहा अवचर मॅडम, गणेश देशपांडे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम यशकल्याणी सेवाभावी सदन येथे प्राध्यापक गणेश करे यांच्या उपस्थित व प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर व पोस्टातील सर्व स्टाफ यांच्या उपस्थित संपन्न झाला.

कोकरे साहेब यांनी या विम्याचे महत्त्व आपल्या महत्त्वपूर्ण शब्दात मांडले व पेंटर्स म्हणजे स्वतःच्या अंगा खांद्यावर रंग सांडून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे रंग आणून आपले काम परिपूर्ण करत असतात व हे काम वरती चढून करणे अत्यंत कष्टाचे आहे व यासाठी आपल्याला स्वतःचा जीव धोक्यात घालून ह्या गोष्टी कराव्या लागतात असे त्यांनी सांगितले.

गणेश करे पाटील यांनी जर आपण निर्जीव वाहनाचा विमा काढत असू तर आपल्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे हेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी शहरातून व ग्रामीण भागातून पेंटर्स सहभाग होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुथा अबॅकस अकॅडमीच्या संचालिका ज्योती मुथा यांनी केले व प्रास्ताविक करे पाटील सरांनी केले.