करमाळासोलापूर जिल्हा

व्हारयल पोस्ट वरुन करमाळा तालुक्याचे राजकारण तापले ; समर्थकांकडुन चौकशी व कारवाईची मागणी

समाचार टीम

करमाळा तालुक्याचे राजकारण सध्या एका वायरल पोस्टमुळे चांगलेच कापलेचे दिसून येत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सोशल मीडियात एक पोस्ट वायरल होत आहे. त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याची दिसून येत आहेत. त्या आरोपांना कोणत्याही आधार नसल्याचे यातून दिसत असतानाही त्याचा रोख हा माजी आमदार नारायण पाटील गटाच्या कडे वळवलेला दिसून येत आहे. यातूनच दोन्ही गट सध्या आमने-सामने येत असल्याने तालुक्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.

नुकताच माजी आमदार नारायण पाटील यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात पार पडला. वाढदिवस पार पडतो ना तोच एक व्हायरल पोस्ट तालुक्याच्या विविध ग्रुप वर फिरू लागली. या पोस्टच्या माध्यमातून माजी आमदार नारायण पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील व संस्था च्या माध्यमातून पाटील गटाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा यातून स्पष्ट होत होते. पण संपूर्ण पोस्टमध्ये कोणाचेही नाव टाकलेली दिसून येत नव्हते. त्यामुळे निनावी टाकलेली ही पोस्ट नेमकी कोणासाठी टाकली हा जरी प्रश्न पडत असला तरी याचा रोख हा जेऊरकडे असल्याचा दिसून येत होते. त्यामुळे यातून पाटील गटाची बदनामी होत असल्याची तक्रार पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी करमाळा पोलीस ठाण्यात केली.

सदर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तालुक्यातील पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जेऊर येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी माजी आमदार नारायण पाटील हे तालुक्यात नसल्याने त्यांनी फोनवरून कसलेही प्रकारचा वाद होऊ नये याची काळजी घेतल्याने कार्यकर्त्यांनी शांत होत करमाळा पोलीस ठाणे गाठले व या ठिकाणी येऊन तक्रार केली. पोलिसांनीही जेऊर येथील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू होते. समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारची पोस्ट वायरल करणे हा सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याविषयी कलमाप्रमाणे गुन्हा अदखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो.

संबंधित कार्यकर्त्यांना विनाकारण पोलिसांनी पोलीस ठाण्यात दिवसभर ठेवले असल्याने सदरचा सर्व प्रकार हा निंदनीय असल्याची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यातून आमदार संजय मामा समर्थक कार्यकर्त्यांना उद्या एकत्र येण्याच्या सूचना या पोस्टद्वारे देण्यात आल्या आहेत. मुळात सदरची पोस्ट ही मामा समर्थक कार्यकर्त्यांच्या वतीने फिरवली जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते व वातावरण तापलेले दिसून येत आहे. यात नेमके पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वेळीच सर्व प्रकार हा थांबवला नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE