करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा ग्रामीणवाले “ना घर का न घाट के” ; मंगळवेढा पॅटर्न राबवण्याची गरज

करमाळा समाचार – विशाल घोलप 

करमाळा तालुक्यातील करमाळा ग्रामीण म्हणून ओळख असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. साधारण पाच हजार लोकसंख्या असलेल्या या भागातील लोकांना शहरी व ग्रामीण दोन्हीही सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होताना दिसत आहे. यावर प्रशासनाने वेळीच तोडगा काढून संबंधितांचा त्रास कमी करणे गरजेचे आहे.

करमाळा शहराची हद्द वाढ नसल्याने शिवाय ग्रामीण भाग असलेल्या खेडोपाड्यांच्या व शहराच्या मधोमध असलेल्या वाडी वस्तींवर रहिवासी भाग वाढला आहे. याशिवाय शहरापासुन जवळ मौलाली माळ, एसटी कॉलनी, तुकाराम नगर, बागवान नगर अशा भागात लोक वस्ती वाढली आहे. परंतु सदरचा भाग हा ना ग्रामीण मध्ये मोडतो, ना शहरी भागात. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना नगरपरिषदेमध्ये केवळ मतदानापुरता अधिकार असून इतर कोणत्याच बाबींचा लाभ या लोकांना मिळताना दिसून येत नाही.

politics

शहर हद्दीत असल्यानंतर करमाळा नगर परिषदेच्या माध्यमातून मिळणारे पाणी, रस्ते, वीज या सुविधा मिळू शकतात. तर ग्रामीण भागात असताना त्या भागातील विविध योजनांसह मूलभूत सुविधा मिळणे सोपे जाते. परंतु सदरचे रहिवासी हे दोन्ही भागात नसल्यामुळे त्यांना मूलभूत सुविधा व शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. यासंदर्भात काही रहिवासी तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी सदरचा भाग करमाळा नगर परिषदेच्या हद्द वाढ भागात घेता येईल याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेऊ असे सांगितले होते. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांचं बोलणंही झालं होत.

मंगळवेढ्याचा ग्रामपंचायत पॅटर्न..
मंगळवेढा भागात हद्द वाढ न करता त्या ठिकाणी नवी ग्रामपंचायत निर्माण करण्यात आली होती. ती ग्रामपंचायत सर्वात मोठी असल्याचे बोलले गेले. कारण शहर हद्द व ग्रामीण हद्द यामध्ये न येणारे वस्त्यांचा व रहिवासी भागाचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. साधारण ३००० लोकसंख्या व ६४ किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्राचा यात समावेश करण्यात आला होता, असाही एक पर्याय करमाळा ग्रामीणच्या नागरीकांसाठी उपलब्ध होऊ शकतो. सर्व भाग एकत्र नसल्याने जो भाग शहर हद्दीत वाढ करुन घेता येईल तिथे शहर हद्द वाढ तर जो ग्रामीण भागाशी निगडीत व जोडला जाऊ शकतोत्याला ग्रामपंचायत निमिर्ती पर्याय असु शकतो.

प्रस्ताव आल्यास …
करमाळा ग्रामीण मध्ये राहत असलेल्या लोकांना कागदपत्रे व इतर बाबतीत काम चलाऊ सहकार्य केले जाते कोणाचीही अडवणुक केली जात नाही पण हा प्रश्न कायम मिटवण्यासाठी मंगळवेढ्याच्या धर्तीवर ग्रामपंचायत तयार करणे हा पर्याय आहे. शहर तसेच ग्रामीण असे दोन वेगळे टप्पे असल्याने शहर हद्द वाढ करणे तसेच ग्रामपंचायत तयार करणे असे जे शक्य असेल तर पर्याय उपलब्ध होऊ शकतात त्यासाठी तसा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करु व माहीती घेऊन तोडगा काढला जाईल.
– शिल्पा ठोकडे, तहसिलदार करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE