करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात मराठा समाज आक्रमक ; नेत्यांना प्रवेश बंदी नंतर खुले आव्हान

करमाळा समाचार

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या आंदोलनात तळागाळातील मराठा बांधवांनी सहभाग नोंदवला आहे. तर गावोगावी नेत्यांना प्रवेश बंदी केल्यामुळे कोणतेही नेते सक्रिय सहभाग घेताना दिसत नाहीत. त्यातच आता करमाळा तालुक्यातील मराठा बांधवांनी नेत्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी व मराठ्यांना आरक्षण देण्याची प्रयत्न करावेत यासाठी लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तर ‘आरक्षण मिळाले नाही तर मतदान नाही’ अशी भूमिका घेतल्याने आता नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

यासंदर्भात “मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी अन्न व पाण्याशिवाय अमरण उपोषण सुरू केले आहे. तर गावोगावी नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. तसेच तहसील परिसरात साखळी उपोषण सुरू आहे. पण मागील चार दिवसात मराठा नेत्यांकडून एकही शब्द तोंडातून निघाला नसल्याचे दिसून येत आहे. त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काय केले याचा जाब प्रत्येक मराठ्यांनी आपापल्या नेत्याला विचारला पाहिजे.” असा मेसेज टाईप केलेला मेसेज व्हायरल केला आहे.

सदरच्या मेसेजवर भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या मोबाईल क्रमांकासह संबंधित मेसेज वायरल करण्यात आला आहे. यामध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना जाब विचारावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे व जरांगे पाटील हे समाजासाठी लढत आहेत त्यांच्या जीवाला बरे वाईट होऊ नये त्यामुळे लवकरात लवकर प्रयत्न करावेत अशी भूमिका यातून मांडण्यात आली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE