पोलिस मित्र संघटनेचा ३५ वा वर्धापन दिन संपन्न
समाचार टीम
पोलिसांच्या हक्काचे निवास कामांच्या तासाबाबतचा प्रलंबित मूलभूत प्रश्न सोडवायला हवेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर निश्चित वाढ होऊ शकेल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

पोलिस मित्र संघटनेच्या ३५ वर्धापन दिनानिमित्त पंडित जवहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पोलीस दलात उतृष्ट कामगिरी बजवणाऱ्या अधिकारी व कर्मचऱ्यांचा तसेच सामाजिक शेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. ही संघटना १९८७ सालापासून पोलिसांच्या अधिकारासाठी आंदोलन करत आहे.

तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी अतुल पोपट काळे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे सोलापूर जिल्हातील कामे बघून त्यांची नियुक्ती केल्याचे पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कपोते साहेब यांनी सांगितले. त्या प्रसंगी आमदार रोहित पवार, संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, माझी आमदार मोहन जोशी, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, डीजीपी ॲड. एन . डी पाटील तसेच पोलिस दलातील बरेचसे अधिकारी उपस्थित होते.
अतुल काळे यांना पद देताना त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी अक्षय भाऊ काळे, विजय काळे, शुभम बोबडे आदी का्यकर्ते उपस्थित होते.