करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

वाळु उपसा थांबवायला गेलेल्या पोलिस पाटलाला ट्रॅक्टरचा धक्का ; तिघांवर गुन्हा दाखल

करमाळा समाचार –

सीना नदी पात्रातून ट्रॅक्टरने वाळू चोरी करून घेऊन जात असताना पोलीस पाटलाने विरोध केल्यानंतर कोतवाल व पोलीस पाटलाला धक्काबुक्की करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी तिघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार १० जुलै रोजी पहाटे चारच्या सुमारास पोटेगाव परिसरात घडला आहे. याप्रकरणी मयूर चंद्रकांत क्षीरसागर (तलाठी) यांनी फिर्याद दिली आहे.

गणेश शिंगटे, रा. घारगाव, आजिनाथ बागडे रा. पोटेगाव, श्रीराम गिरी रा. घारगाव या तिघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अंकुश शिरगिरे, पोलीस पाटील व दत्तू अडसूळ कोतवाल पोटेगाव यांना धक्काबुक्की करण्यात आले आहे. यावेळी टॅक्टरचा धक्का लागुन पडल्यामुळे पोलीस पाटील अंकुश शिरगिरे यांच्या उजव्या हाताला फॅक्चर झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मौजे पोटेगाव येथे रात्री सीना नदीच्या पात्रातून वाळू चोरी होत असल्याबाबत ची माहिती मिळाल्यानंतर तलाठी क्षीरसागर हे पोथरे येथील मंडल अधिकारी अनिल ठाकर यांना घेऊन तरटगाव भागात गस्त घालत होते. तर अंकुश शिरगिरे व दत्तू अडसूळ हे पोटेगाव परिसरात गस्त घालत होते. रात्री पावणेचार च्या सुमारास पोटेगाव बाळेवाडी रस्त्यालगत कैलास जगदाळे यांच्या घराजवळ नदीकडून पोटेगाव मध्ये एक लाल रंगाचा ट्रॅक्टर वाळू भरलेला ट्रेलर सह आला असता त्याला पोलीस पाटलांनी थांबवले.

त्यावेळी त्यामध्ये अंदाजे एक ब्रास वाळू होती. यावेळी चालक आजिनाथ बागडे व श्रीराम गिरी यांनी पोलीस पाटील व कोतवाल यांना धक्काबुक्की करून वाळूचा ट्रॅक्टर तेथून घेऊन जात असताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रॅक्टरचा धक्का लागून पोलीस पाटील खाली पडले. यांच्या उजव्या हाताला लागले. त्यामुळे उजवा हात फॅक्चर झाला आहे. त्यानंतर सदरची माहिती वरिष्ठांना दिली. सदर माहितीवरून तिघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE