कर्नाटक विधानसभा – निवडणूक बंदोबस्त करिता सोलापूर जिल्ह्यातून ४०० होमगार्ड जाणार
सोलापूर (प्रतिनिधी)
कर्नाटक विधानसभा निवडणुक सुरू असून येत्या 10 मे रोजी तेथे मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने आपल्या सोलापूर जिल्ह्यातून यासाठी ४०० होमगार्ड जवान पाठविण्यात येणार आहेत तर महाराष्ट्रातून 3000 अशी माहीती पत्रकारांशी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक हिम्मतराव जाधव यांनी दिली आहे.

यावेळी सोलापूर जिल्हा होमगार्ड प्रशासकीय अधिकार श्री माळी,केंद्रनायक श्री. सुतार,वरिष्ठ लिपिक श्री. मोरे,कनिष्ठ लिपिक श्री. चव्हाण उपस्थित होते. याबाबत अधिक माहीती देताना हिम्मतराव जाधव म्हणाले की, कर्नाटक बंदोबस्त करीता होमगार्ड जवानांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था कर्नाटक राज्याकडून करण्यात आली असून, ज्या ठिकाणी त्यांना कर्त्यव्यासाठी देण्यात येणार आहे, तिथेच त्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यांना त्यांचे मानधनही तिथेच रोखीने अदा करण्यात येणार आहे.आमचे होमगार्ड जवान बाहेर राज्यात बंदोबस्त कर्तव्य बजावण्यासाठी जाणार असल्याने त्यांचे इतर कर्तव्य मानधनही आम्ही नुकतेच बँकेत जमेसाठी पाठविलेले आहे. जेणेकरून होमगार्ड जवानांना आर्थिक अडचण निर्माण होवू नये यासाठी तातडीने बिले बॅकेत टाकली आहेत.

होमगार्डचे कर्तव्य मानधन बँकेत जमा करताना आमच्याकडेही योग्य ती कागदपत्र प्रत्येक तालुक्यातून एकाच वेळेवर जमा होत नाहीत, काही तांत्रिक अडचणी असतात परंतु त्याच्यावरही आम्ही पाठपुरावा करून ते लवकर उपलब्ध करून घेत असतो. यावेळी बँकेत बिले जमा होण्यासाठी थोडासा विलंबही होवू शकतो, जरी उशीर कदाचित झालेला असला तरी सण,उत्सव,बाहेरगावी बंदोबस्त अशा अत्यंत गरजेच्यावेळी होमगार्ड जवानांना त्यांचे कर्तव्य मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा हे केलेच जाते हा इतिहास विसरता येत नाही.असे शेवटी श्री. जाधव यांनी सागितले.
जिल्हा समादेशक यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त कर्नाटक येथे रवाना करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका समादेशक अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेवून होमगार्ड जवानांचे संख्याबळ पुरविलेलेआहे…..
केंद्रनायक श्री. सुतार
कर्नाटक येथे आपल्या जिल्ह्यातून होमगार्ड रवाना होणार असल्याने त्यांना आर्थिक अडचणीतून जावे लागु नये यासाठी जिल्हा समादेशक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्डचे भत्ते देयक तातडीने सोलापूर कोषागार कार्यालय येथे सादर करण्यात आली आहेत. सदर देयके तातडीने पारित करणेबाबत मा.जाधव साहेब जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी कोषागार अधिकारी यांचेशी संपर्क साधून बोलणे केले आहे. सदर देयके पारित होताच होमगार्ड यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत पुढील कार्य वाही करणेत येईल.
प्रशासकीय अधिकारी श्री. माळी .